बळिराजा आत्मसन्मान संस्थेचे व अंधश्रध्दा निर्मुलन वैज्ञानिक समितीतर्फे ॲड.प्रिया शहा यांना राजमाता जिजाऊ जिवनगौरव पुरस्कार जाहिर


मावळ मराठा न्यूज, (वार्ताहर)अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन समिती तसेच डॉ.प्रताप दिघांवकर प्रणित बळिराजे आत्मसंन्मान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा मानाचा राजमाता जिजाऊ जिवनगौरव पुरस्कार ह्यावेळेस अलौकिक समाजिक कार्य करून उल्लेखनीय समाज सेवेची दखल घेवुन दादर मुंबई येथील ॲड. प्रिया शहा यांना देण्यात येणार असल्याचे अंधश्रध्दा निर्मुलन व वैज्ञानिक समितीचे अध्यक्ष रंजनजी खरोटे व बळीराजाचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र वाघ यांनी संयुक्तरित्या पत्राद्वारे कळवले आहे १५ जानेवारीला सकाळी ११ वाजता कल्याण भवन,धुळे येथे दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे ,त्यांच्या निवडीची बातमीनंतर अनेक मान्यवरांनी ॲड प्रिया शहा यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. ॲड प्रिया शाह या अमळनेर येथील माहेरवाशिन आहेत.त्यांना पुढील वाटचाली साठी साप्ताहिक मावळ नागरिक,एम एन न्यूज आणि मावळ मराठा न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.




