श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ.शिवाजी देसाई यांची एज्युकेशन विषयाच्या अभ्यास मंडळावर निवड


मावळ मराठा न्यूज :-कुसगाव, (बु)लोणावळा दि.११ मे,२०२३ येथील श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन चे प्राचार्य डॉ.शिवाजी देसाई यांची एज्युकेशन विषयाच्या अभ्यास मंडळावर नुकतीच नेमणूक झाल्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मा. कुलगुरू यांनी आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्या शाखेमध्ये समाविष्ट असलेल्या एज्युकेशन विषयासाठी विभाग प्रमुख नसलेल्या ३ अध्यापकापैकी एक अशा प्रवर्गामध्ये निवड झाल्याचे कळविले आहे. आतापर्यंत डॉ.देसाई यांनी२५ शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रसिद्ध केले असून एकूण आठ विद्यार्थ्यांना पीएच.डी चे मार्गदर्शन सुरू असून दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण शास्त्र विषयातील पीएच.डी प्राप्त झाली आहे. तसेच ६० राज्यस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन पर लिखाण सादर केलेले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सिंहगड लोणावळा संकुला मधील सर्व प्राचार्य व संचालक यांच्यावतीने संकुल संचालक डॉ एम. एस. गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या दरम्यान ही निवड झाल्याने त्यांना अधिक भरीव कामगिरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे. याप्रसंगी संकुलामधील अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल व्यवस्थापन, व्यवस्थापन व कॉमर्स महाविद्यालयांचे प्राचार्य / संचालक अनुक्रमे डॉ. रोहोकले,डॉ.नलावडे ,डॉ. नाथ ,डॉ. नखाते व डॉ. देसाई उपस्थित होते.




