महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर यांच्या हस्ते १६ फेब्रुवारी रोजी होणार लोणावळ्यातील कलाकारांचा सन्मान




मावळ मराठा न्युज -लोणावळा,सुर साधना गायन क्लासेस चा तिसरा वर्धापन दिन ऍड बापूसाहेब भोंडे विद्यालयात रविवार दिनांक 16 फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता साजरा होत असून यावेळी कलाकारांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे या सोहळ्यास महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमात सुर साधना क्लासेस चे ३५ विध्यार्थी गीत माला सादर करणार आहे प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले असून बक्षीसामध्ये भाग्यवान प्रेक्षकांना एल इ डी टीव्ही, कुलर फॅन, मिक्सर, सुटकेस, व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळणार आहेत गेली अनेक वर्षे आपल्या आवाजाने जादू करणाऱ्या गायिका उत्तरा केळकर त्यांच्या खास शैलीतील चला जेजुरीला जाऊ, बिलंची नागीन निघाली या गाण्याची झलक सादर करणार आहेत लोणावळ्यातील कला,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे कार्यक्रमास सहकार्य लाभले आहे.अशी माहिती सुर साधनाचे संचालक प्रदीप वाडेकर यांनी दिली.




