मृत्युच्या जबड्यातून वाचविले आपल्या पिलाचे प्राण; आईच्या वात्सल्याचे दर्शन

हिंगोली- आई ही खरोखरच आई असते ती आपल्या बाळाला मृत्यूच्या दाढेतून काढण्यासाठी नको ते प्रयत्न करत असते, वेळ पडली तर स्वतःचा जीव देखील गमावण्यासाठी आई अजिबात मागेपुढे पाहत नाही. याचेच दर्शन झालेय सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक येथे.

हा ह्र्दयस्पर्शी क्षण अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केलाय. विद्युत प्रवाह सुरू असलेल्या ताराला स्पर्श होऊ वनरणीचे पिलू थेट रोहित्रावर आदळले. पिलू जोर जोरात किंचाळत होते. तोच काही वेळात त्या ठिकाणी वानरांचा थाफा दाखल झाला, निपचित पडलेल्या पिलाला वाचवण्याची कुणाची हिंमत होत नव्हती, अन पिलू देखील ओरडून ओरडून हिर्मुसुन गेले होते,

बघ्याना ही वाटले की आता पिलाने निरोप घेतला, मात्र आई ने अजिबात वेळ वाया न जाऊ देता आणि जीवाची जराही परवा न करता आपल्या पिलांच्या किंचाळलेल्या आवाजाकडे धाव घेऊन रोहित्रा वरून अलगत आपल्या पिलाला हळूच जवळ ओढून घेतले, आणि पिल्लूही आईच्या कुशीत आल्यानंतर शांत झाले आईच्या कुशीत आल्यावर त्याला एवढे बरे वाटले की, ते आपल्या साथीदाराकडे टकमक पाहत होते. हा भयंकर क्षण परिसरात अ सलेल्या काही नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला,यातूनच आईचे दर्शन दिसून आले.

खरोखरच आई ही किती मोठी असते हे या विदारकक्षणावरून पुन्हा एकदा आईचे दर्शन झाले, त्या ठिकाणी दाखल झालेली वानरसेने आई व पिलाला सोबत घेऊन तिथून त्यांनी पळ काढला. एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच काहीचा क्षण या ठिकाणी नागरिकाला अनुभवायला आला आतापर्यंत आपण एखाद्या चित्रपटांमध्ये आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी कसे प्रयत्न करते हे अति बारकाईने दाखविले जाते परंतु या ठिकाणी खरोखरच हा क्षण नागरिकांनी पाहिला या प्राणीमात्रावरून आईच्या ममत्वाचे दर्शन झाले आहे.

हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कऱ्हाळे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page