तुम्ही विद्यार्थीच देशाचे आधार स्तंभ आहात.जे काही कराल ते उत्तमच करा- डॉ ज्योती भाकरे



मावळ मराठा न्युज -लोणावळा -लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे डॉ. बी.एन.पुरंदरे आर्टस्, श्रीमती एस.जी. गुप्ता कॉमर्स आणि एस. एस.ए.एम. सायन्स सिनियर कॉलेज, आर्टस्, कॉमर्स आणि विज्ञान जुनियर कॉलेज, लोणावळा यांचे वार्षिक स्नेह संमेलन आणि व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे सावित्री बाई फुले विद्यापीठाच्या प्रमुख ऍड. डॉ ज्योती भाकरे, संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर,विश्वस्त नंदकुमार वाळुंज,विश्वस्त सुनील ठोंबरे,विशाल पाडाळे,संमेलन प्रमुख धनराज पाटील,एनि वर्गिस,प्रा.विलास पाटील,प्राचार्य डॉ नरेंद्र देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी तुम्ही विद्यार्थीच देशाचे आधार स्तंभ आहात.जे काही कराल ते उत्तमच करा असा सल्ला सावित्री बाई फुले विद्यापीठाच्या डॉ ज्योती भाकरे यांनी वार्षिक स्नेह संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी दिला.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कला नृत्य सादर केली.तर संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर यांनी विजेत्यांचे अभिनंदन तर बाकी विदयार्यांना शुभेच्छा दिल्या.उत्तम कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांचा देखील प्रमुख पाहुणे डॉ भाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.




