प्रा.दीपक तारे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त श्री शिवशंभु ट्रस्ट आयोजित रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद १४७ बाटल्या रक्त संकलित

मावळ मराठा न्युज – लोणावळा,कै. दीपक वसंत तारे (सर)यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त वलवण कॉलेज, लोणावळा येथे श्री शिवशंभू चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आणि अक्षय ब्लड बँक यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर आज मंगळवार दि.०८ एप्रिल २०२५ आयोजित करण्यात आले या रक्तदान शिबिराचे मुख्य आयोजक विनोद विष्णु होगले आणि मित्र परिवार,आजी माजी विद्यार्थी वृंद,शिक्षक वृंद यांनी या शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवला.या शिबिरास विद्यार्थ्यांसह शिक्षक व तारे सरांचे मित्र-परिवार यांनी मनापासून सहभाग नोंदवला. या उपक्रमात एकूण विक्रमी अश्या १४७ बाटल्या रक्त संकलित करण्यात आल्या. प्रा. तारे यांचेवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या सहकारी शिक्षक,आजी, माजी विद्यार्थी यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवून खऱ्या अर्थाने दीपक तारे सरांना प्रथम पुण्यस्मरण निमित्त रक्तदान हे श्रेष्ठ दान या सामाजिक बांधिलकी तून मोठया प्रमाणावर रक्तदान केले. या शिबिरासाठी डॉ. रवी कोपनर, डॉ. अभिजीत अरणकल्ले, डॉ. दीपाली पाटील, डॉ. अमोल नवले, ऋषी साळुंके, अरण्य घाडगे, अक्षय चौधरी, केतन सुरवसे, शामराव पांढरे, पल्लवी मेहेंदळे, वैष्णवी सांयबर, कोमल पवार आणि श्रेया नारगुंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page