वडगाव मावळ लिगल प्रक्टीशनर्स असोसिएशन ऍक्शन मोडमध्ये,काल शपथ ग्रहण आज कामाचा धडाका

मावळ मराठा न्युज – वडगांव,जेमतेम २४ तास झाले वडगाव मावळ लिगल प्रक्टीशनर्स असोसिएशनचा शपथ ग्रहण समारंभ होऊन लगेच कश्मीर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला,सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण करण्यात आले आणि आपल्या वकील सहकारी असलेले श्री.पायगुडे यांना आपले समक्ष मारहाण व दमदाटी केली. या कृत्याचा नुसता निषेध न करता त्या माजोरी आणि वकील बंधू भगिनींशी उद्धट वागणाऱ्या वडगाव मावळ पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी कमाल माजी याचा संघटने तर्फे निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला.असाच कामाचा धडाका राहिला तर शासकीय कार्यालयातील लाचखोर आणि कामचुकार कर्मचाऱ्यांना धडा शिकवल्यास गोर गरीब नागरिकांची कामे त्वरित आणि लाच न देता होतील तरी वकिल वर्गाचा या संघटनेचा वचक कायम राहावा अशी अपेक्षा नागरिक या ऍड रंजना भोसले यांच्या नेतृत्वातील नवीन अभ्यासू आणि जागृत टीम कडून आहेत. सर्व टीम निदान मावळ पुरता तरी पुढाकार घेऊन मावळातील नागरिकांना चिंता मुक्त करेल अशी माफक अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहें. मावळ मराठा न्युज परिवाराकडून नवीन कार्यकारिणीला खूप खूप शुभेच्छा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page