पद्मश्री डॉ.बी.एन.पुरंदरे बहुविध विद्यालयाची आषाढी दिंडी मोठ्या उत्साहात







मराठा न्युज -लोणावळा,आज शनिवार दिनांक २८ जून २०२५ रोजी पद्मश्री डॉ.बी.एन.पुरंदरे बहुविध विद्यालयाची आषाढी दिंडी मोठ्या उत्साहात पार पडली .इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला .वारकरी वेशात शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आनंदाने दिंडीमध्ये सहभागी झाले होते . डोक्यावर विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्ती तसेच तुळस घेऊन विद्यार्थिनी यामध्ये सहभागी झाल्या .संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांची पालखी अतिशय सुंदर व आकर्षक रित्या सजवली होती .टाळ मृदुंग व त्यांच्या जोडीला ढोल व लेझीम. अशी ही दिंडी पुरंदरे शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक , इंद्रायणी पूल या मार्गाने श्रीराम मंदिर भांगरवाडी या ठिकाणी पोहोचली .विद्यार्थ्यांनी प्रभु श्रीरामचंद्रांचं दर्शन घेतलं .त्या ठिकाणी रिंगण, फुगड्यांसह हरिनामाचा जयघोष करण्यात आला .यावेळी लोणावळा नगरीचे माजी नगरसेवक व शाळेचे माजी विद्यार्थी श्री. देविदास भाऊ कडू यांनी दिंडीचे स्वागत केले .विद्यार्थ्यांबरोबर हरिनामाच्या गजरात ते ही मग्न झाले .देविदास भाऊ कडू यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप केले .याप्रसंगी माजी नगरसेविका सौ. अपर्णाताई बुटाला याही उपस्थित होत्या .या आषाढी दिंडीच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. यशवंत बारवकर सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. आनंद गावडे सर,पर्यवेक्षक श्री. रणपिसे सर तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले .




