टाकवे बुद्रुक येथील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी वडगाव पोलीस स्टेशन ला निवेदन







मावळ मराठा न्युज -टाकवे,टाकवे बुद्रुक येथील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी वडगावचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना माजी चेअरमन राजू शिंदे व विकास असवले यांनी निवेदन दिले.मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथून आंदर मावळचा प्रवास सुरू होतो. येथून पुढे सह्याद्रीच्या पर्वत रांगा, पांढरे शुभ्र वाहणारे धबधबे,धरणाचे जलाशय हिरवीगार असणारी शेती माळराने विविध प्रकारची झाडे – वेली या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी शहरी भागातील लाखो पर्यटक सुट्टीच्या दिवशी आंदर मावळमध्ये शनिवारी व रविवारी दाखल होत असतात. टाकवे बुद्रुक हे आंदर मावळ मधील ४९ ते ४५ गाव वाड्या – वस्त्याची मुख्य बाजार पेठ आहे. सोमवार आठवडे बाजार असतो.परिणामी शनिवार, रविवार, सोमवार या तीन दिवस खूप मोठ्या प्रमाणात टाकवे बुद्रुक मध्ये वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अनेक वेळा एक -एक किलोमीटर लांबच लांब पर्यंत वाहनांच्या रांगा आहे. यामध्ये शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका, याभागात हॉस्पिटल असणारे डॉक्टर,शिकवण्यासाठी येणारे शिक्षक, महिला – पुरुष कामगार वर्ग ,शेतकरी,व्यवसायिक, राज्य परिवहन महामंडळाची बस, मालवाहतूक करणारी वाहने असे अनेक जण तासनतास अडकून राहत आहेत. त्या अनुषंगाने टाकवे बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते माजी चेअरमन राजू शिंदे व माजी चेअरमन विकास असवले यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हंटले आहे टाकवे बुद्रुक हे ५० गावची मुख्य बाजारपेठ आहे खंडोबा म्हाळसाकांत चौक ते बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये शनिवार रविवार आणि सोमवार यादिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत आहे,खांडी ३५ किलोमीटर व सावळा मार्गे ३० किलोमीटर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एस टी बस यांना प्रवाशी घेऊन जाण्यासाठी खूप उशीर होत आहे.पीएमपीएल बसची देखीले वेळेत ये जा होत नाही.सध्या पाऊस सुरु असल्याने अनेक पर्यटक या परिसरामध्ये येत आहे, त्यामध्ये काही हुल्लडबाज पर्यटक रस्त्यामध्ये वाहने वाकडी -तिकडी लावतात परिणामी वाहतूक कोंडी होते,याचा सर्वसामान्य नागरिकांना नहाक त्रास सहन करावा लागत आहे, टाकवे येथे अनेक हॉस्पिटल,प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, रुग्णवाहिकेंना देखील ये जा करण्यासाठी रस्ता मोकळा मिळत नाही.वाहतूक कोंडीमुळे कामगारांना कामावरती जाता येत नाही,लोकल गाडी मिळत नाही, विद्यार्थी वेळेत शाळेत पोहचत नाही. त्यामुळे खंडोबा चौक येथे दोन व बाबासाहेब आंबेडकर चौक ते बस स्टॉप पर्यंत दोन टवाहतूक पोलीस कर्मचारी नेमण्यात यावे. सोमवारीअसणारा आठवडे बाजार त्यादिवशी दोन्ही चौकामध्ये एक – एक वाहतूक पोलीस कर्मचारी कायम स्वरूपी नेमण्यात यावेत पन्नास गावच्या नागरिकांची व पर्यटनाची होणारी गैरसोयी दूर करावी असे निवेदनात म्हटले आहे .




