लोणावळा वुमन्स फाऊंडेशनतर्फे महिला उद्योजिकांना सक्षम करण्यासाठी उद्यमी कार्यशाळेचे आयोजन

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळ्यात “उद्यमी लोणावळा” कार्यशाळेचे आयोजन वुमन्स फाऊंडेशनच्या वतीने येथील हॉटेल चंद्रलोक येथे करण्यात आले.या प्रसंगी लोणावळा वुमन्स फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा,ब्रिंदा गणात्रा यांनी लोणावळा शहर परिसरातील उद्योजक, उद्योमी,महिलांसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ,तसेच महिला च्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोणावळा वुमन्स फाऊंडेशन ची २०१९ ला स्थापना केली.यात छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या महिला मोठ्या संख्येने यात सहभागी होत आहेत.लोणावळा शहर,परिसरातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी चालना देण्याचा मानस लोणावला नगरीच्या माजी नगरसेविका ब्रिन्दा गणात्रा यांचा आहे .या उद्यमी लोणावळा कार्यशाळेच्या मार्गदर्शक छाया कोळेकर यांनी महिलांना कोणकोणते,उद्योग सुरु करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे,व्यवसाय कसा करायचा?कधी? कोठे करायचा याची संपूर्ण माहिती महिलांना या कार्यशाळेत दिली. तसेच काही व्यावसाय करणाऱ्या महिलांनी व्यवसायाबद्दल आवश्यक माहिती विचारली त्याला कोळेकर यांनी सविस्तर उत्तरे दिली . महिलांनी स्वयंरोजगाराच्या आणि उद्योगात येणाऱ्या विविध संधीचा फायदा घेऊन एक उत्कृष्ठ उद्योजक म्हणून आपले स्वप्न पूर्ण करावे.यासाठी स्वतःचा आत्मविश्वास व व्यवसाय करण्याची ताकद निर्माण करून स्वतःचा व्यवसाय उभा करणे हे उद्दिष्ठ ठेऊन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कार्यशाळेच्या मार्गदर्शक, छाया कोळेकर यांनी उद्यमी महीलांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. या उद्यमी कार्यशाळेच्या कार्यक्रमात . याप्रसंगी उद्यमी महिलांसह, लोणावळ्यातील माजी नगरसेविका,गौरी मावकर,मंदा सोनवणे,जयश्री आहेर,अपर्णा बुटाला, सुवर्णा अकोलकर आणि लोणावळा परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.तसेच लोणावळा नगरपरिषद माजी नगरसेवक,भाजपा देविदास कडू,माजी शहरध्यक्ष, lभाजप दादा धुमाळ,तसेच हिंद विजय नागरी पतसंस्था चे संस्थापक ऍड.रवींद्र दाभाडे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अफरिन खान,गौरी शाह यांनी केले आभार शहनाज बेग यांनी केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page