तळेगाव येथील मधुबन फाउंडेशन या वृद्धाश्रमात मनशक्ती केंद्र लोणावळा तर्फे ४६जणांची विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधे वाटप

मावळ मराठा न्युज -लोणावळा,दिनांक २६ जुलै शनिवार रोजी तळेगांव येथील मधुबन फाउंडेशन या वृद्धाश्रमात मनशक्ती केंद्र लोणावळा तर्फे विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्व बंधू व भगिनी मिळून असे ४६जणांची तपासणी करण्यात आली. कातडीचे आजार,अशक्तपणा,विटामिनची कमतरता अशा प्रकारचे रुग्ण होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आरोग्यदूत श्री राजूशेठ खंडेलवाल,श्री डॉ संतोष निकाळजे सौ निकाळजे शोभा पाटेकर,शांती परब यांनी या आरोग्य सेवेत सहभाग घेतला. यावेळी राजेश जी भोसले, अनुराधा कॉन्ट्रॅक्टर आदी मान्यवर उपस्थित होते.मनशक्ती केंद्रातर्फे डॉ. संतोष निकाळजे यांनी मधुबन वृद्धाश्रम मधील ज्येष्टयाची तपासणी केली. आणि सगळ्यांना मोफत औषधे देण्यात आली.या वेळेस मधुबन ट्रस्ट चे तुषार दळवी आणि त्यांचे वडील उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page