*लायन्स क्लबच्या वतीने सुदुंबरे येथे-एन डी आर एफच्या जवानांना लायन भगिनींनी बांधल्या राख्या*




मावळ मराठा न्युज नेटवर्क – लायन अध्यक्ष राजेंद्र झोरे -प्रोजेक्ट चेअरमन लायन दिनेश कुलकर्णी – लायन एड मनोहर दाभाडेच्या सौजन्याने आणि सर्व लायन भगिनींच्या उत्कृष्ट संयोजनाने सुदुंबरे येथे-एन डी आर एफच्या जवानांना रक्षा बंधनाचा प्रसन्न पवित्र समारंभ संपन्न झाला! लायन अध्यक्ष राजेंद्र झोरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ कुमुदिनी झोरे- या उभयतांनी सर्व जवान आणि उपस्थितांच स्वागत करून- आंतरराष्ट्रीय लायन्स संघटनेची माहिती देऊन जवानांचा आमच्या सुरक्षितेत किती सिंहाचा वाटा आहे हे- आपल्या मनोगतात विशद केलं! प्रकल्प अधिकारी लायन दिनेश कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात- या रक्षा बंधना मागील क्लबची भूमिका आणि उद्देश स्पष्ट केला! जेष्ठ लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारीनी- शेरोशायरी आणि दृष्टांतातून आपलं मनोगत व्यक्त करून जवानांना मानवंदना दिली! एन डी आर एफ जवानां समवेत चहापानाचा आनंद- लायन सभासदां बरोबरच- खास रक्षाबंधना साठी उपस्थित असलेल्या लायन भगिनींनी अनुभवला!लायन सेक्रेटरी डॉक्टर चेतन ओसवाल यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आभार प्रदर्शनानंतर ज्येष्ठ लायन एडवोकेट मनोहर दाभाडेच्या सौजन्याने सुग्रास भोजनाच्या आस्वादनंतर या उत्कृष्ट अविस्मनीय समारंभाची सांगता झाली!



