*रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने एसएससी बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सिल्याबस ॲप कार्ड चे वितरण*

मावळ मराठा न्युज – लोणावळा,एसएससी बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सिल्याबस ॲप कार्ड चे वितरण करण्यात आले.रोटरी क्लब ऑफ लोणावळा क्लबच्या विद्यमाने दहावीच्या एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना स्टडी बडी कुपन एज्युकेशन ॲप मराठी सेमी इंग्लिश व इंग्लिश मिडीयम च्या विद्यार्थ्यांसाठी खास अभ्यास करण्यासाठी ॲप चे वितरण दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय लोणावळा नगरपरिषद उर्दू विद्यालय येथे करण्यात आले.हे ॲप खास दहावीच्या एसएससी बोर्ड च्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पूर्ण विषयांच्या मराठी सेमी इंग्लिश व इंग्रजी माध्यमांच्या सर्व विषयांच्या सिल्याबस कव्हर केलेला आहे याची मार्केट व्हॅल्यू पंधराशे रुपये आहे हे ॲप वरील शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वितरित करण्यात आले. यापूर्वीही वरील शाळांना रुपये ८० हजार चे ई लर्निंग किट देण्यात आले होते गरीब विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या एकमेव उद्देशाने रोटरी हे उपक्रम राबवित असते. मोबाईल धारक विद्यार्थ्याला हे ॲप डाऊनलोड करून सोप्या पद्धतीने सर्व विषयांचा अभ्यास स्वतंत्रपणे करण्यास खूप मदत करेल .वितरण समारंभासाठी बालकृष्ण बलकवडे मुख्याध्यापक मराठी माध्यमिक विद्यालय सईद नल्लू मल्लू मुख्याध्यापक उर्दू माध्यमिक विद्यालय भांगरवाडी अमजद व रोशन शेख मॅडम उपस्थित होते. तसेच रोटरीच्या नूतन अध्यक्षा विजया कल्याण प्रोजेक्टचे प्रायोजक व देणगीदार रोटेरियन कौस्तुभ दामले.प्रोजेक्टर डायरेक्टर रवींद्र कुलकर्णी, पास्ट प्रेसिडेंट नितीन कल्याण, पास्ट प्रेसिडेंट नारायण शारवाले,रो.तस्निम, विशेष अतिथी डॉक्टर मंदा सोमण व संवाद शाळेच्या संचालिका परमेश्वरी दामले हे उपस्थित होते. वापरण्यास अतिशय सोपे असलेले हे ॲप विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले. जवळजवळ ५० विद्यार्थी विद्यार्थिनींना हे ॲप वाटण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page