सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ यांचेकडून आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा




मावळ मराठा न्युज :- रावेत,सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ आदर्श नगर किवळे रावेत यांनी आपल्या संघ स्थापनेच्या प्रथम वर्षी २१जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला .या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून किवळे येथील ओम शांती केंद्राच्या दीदी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात योग साधना बद्दल महिती देताना महर्षी पतंजली यांच्या अष्टांग योगाची माहिती दिली.यामध्ये कर्मयोग,भक्तीयोग,ज्ञानयोग,बरोबर राजयोग बदल सखोल माहिती दिली.सोमेश्वर महिला योगा ग्रुपच्या सर्व महिलांनी योगा प्रात्यक्षिक करून दाखवली.यामध्ये पुरुषांनी देखील सहभाग घेतला.या प्रसंगी संघाचे अध्यक्ष श्री.सुदमजी दिवटे,यांनी २१ जून हा कार्यक्रम संघ प्रत्येक वर्षी साजरा करील असे सांगितले.परिसरातील नागरिकांनी योगाचे महत्त्व लक्षात घेऊन कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद दिला.संघाचे उपाध्यक्ष श्री.साहेबराव जी देसले पाटील यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले.