मावळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मावळ तालुका नवीन कार्यकारणी जाहीर

मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,मावळ तालुक्यात शिवसेनेचे दोन गट झाल्यापासून नवीन कार्यकारणी पक्ष वाढीसाठी जाहीर करणे गरजेचे होते आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करत तालुक्यात पक्षवाढीसाठी बैठका ,शाखा उभारणी आणि दौरे सुरू करणार असल्याचे तालुका प्रमुख आशिष यांनी मावळ मराठा न्यूज शी बोलताना सांगितले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मावळ तालुका नवीन कार्यकारणी पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने,उपनेते रवींद्र मिर्लेकर,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर,विधासभा संपर्क प्रमुख प्रभाकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे यांनी नुकतीच जाहीर केली.नवीन कार्यकारिणी मध्ये मावळ तालुका संघटक पदी शांताराम भोते,मदन शेडगे,अशोक निकम अमित कुंभार,यशवंत तूर्डे यांची निवड करण्यात आली तर उप तालुका प्रमुख पदी चंद्रकांत भोते,सोमनाथ कोंडे,डॉ विकेश मुथा,एकनाथ जांभूळकर आणि किसन तरस यांची वर्णी लागली आहे. समन्वयक म्हणून रवींद्र गायकवाड,अनिल ओव्हाळ,अनंता हुलावले,अनिल भालेराव आणि रमेश नगरकर यांची तर सल्लागार पदी राजाभाऊ पाचपिंड,रमेश जाधव,मारुती खोले, प्रशांत भालेराव यांचा नवीन कार्यकारिणी मध्ये समावेश करण्यात आला आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page