लोणावळ्यात वाजत गाजत,ढोल लेझिम ताशा, फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालाची उधळण करत,गणपती बाप्पाला शांततेत निरोप






मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळ्यात वाजत गाजत ढोल लेझिम ताशा फटाक्यांची आतश बाजी आणि गुलालाची उधळण करत,गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या च्या जल्लोष करत गणेश भक्तांनी दिला शांततेत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप,लोणावळ्यात मंद पावसाच्या सरीच्या साक्षीने अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.हजारो गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती.ठरलेल्या आणि दिलेल्या क्रमाने गणेश मंडळानी आपली परंपरे प्रमाणे सजावटीत मोठ्या दिमाखात मिरवणूक काढत बाप्पाला निरोप दिला.लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने गणेश भक्तांचे स्वागत करण्यात आले.यावेळी सर्वपक्षांनी गणेश मंडळाचें आणि गणेश भक्त यांचेसाठी स्वागत कक्ष मंडप उभारली होती तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हजारो गणेश भक्तांसाठी दरवर्षाप्रमाणे भंडारा,सत्यनारायण ट्रस्ट च्या वतीने चहा बिस्किटे तर ईश्वरदास अमृतवाणी ट्रस्ट यांच्या वतीने भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली,रामदेव बाबा या संस्थेकडून शेव कुरमुरे वाटप करण्यात आले.



