लायन्स क्लब ऑफ लोणावळा तर्फे लोणावळा औद्योगिक वसाहत नांगरगाव येथे रक्तदान,नेत्र तपासणी,चष्मे वाटप,बीपी,शुगर तपासणी शिबीर

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा तर्फे लोणावळा औद्योगिक वसाहत नांगरगाव येथे सर्व कामगारां साठी रक्तदान शिबीर मोफत नेत्र तपासणी,चष्मे वाटप, बीपी,शुगर,आदी तपसण्या करण्यात आल्या. पुण्याहून हार्मनी हेल्थकेअर सर्विसेस यांनी तपासणी केली. लायन प्रेसिडेंट साधना टाटिया,सारिका अगतवाल, सुमित भदेशीया, तसेच LICEL चे अध्यक्ष श्री संदीप कोराड, गावडे मॅडम, पतंगे मॅडम, गिरीश पारख,लायन सीमा शिंदे यांनी आपला सहयोग नोंदवला.सदरप्रसंगी एकूण ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.डोळे तपासणी २२९ जणांची तर १२५ जणांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. डॉ. सुरेश शर्मा यांची टीम ने खूप मेहनत घेतली आणि मोलाचे सहकार्य केले. सचिन पारख, जे बी बक्षी, आनंद अगरवाल,अवीनाश गांधी यांनी आपली उपस्थिती लावून मोलाचे सहकार्य केले. लायन साधना टाटिया यांनी चष्मे पुरवले तर गिरीश पारख यांनी चिक्कीचे वाटप केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page