लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा,सहारा आंबी व्हॅली बेस हॉस्पिटल,आधार ब्लड बँक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न









मावळ मराठा न्युज – लायन्स क्लब ऑफ लोणावळा-खंडाळा, सहारा आंबी व्हॅली बेस हॉस्पिटल आणि आधार ब्लड बँक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सहारा हॉस्पिटल येथे मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात ६० रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचे उदात्त उदाहरण घालून दिले. प्रत्येक रक्तदात्यास प्रोत्साहन म्हणून ₹ ५ लाखांचे अपघात विमा संरक्षण देण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन लायन डॉ. दिलिप सुराणा (जिल्हा रक्तदान प्रमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी लायन कांता ओसवाल (अध्यक्ष), लायन डॉ. पोपट ओसवाल (जिल्हा वैद्यकीय समिती प्रमुख), लायन रोहित थोऱात (कार्यक्रम प्रमुख), लायन मंगेश कदम, लायन दीप्ती लुनावत, लायन रंजू लुनावत, लायन रिंपल पाटवा, लायन साजिया समाशी, लायन अमित दलवी, झोन चेअरपर्सन एमजेएफ लायन देवल पारेख, कॅबिनेट jivdaya सेवा चेअरमन लायन विरल गाला आदी मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमात सहारा हॉस्पिटलचे डॉ. राज चौव्हाण यांनी विशेष सहकार्य केले.रक्तदान हे सर्वोत्तम दान असल्याचे सांगून उपस्थित सर्वांनी समाजातील नागरिकांना नियमित रक्तदानासाठी प्रोत्साहित केले.



