SRCC मुंबई व रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

मावळ मराठा न्युज -लोणावळा,SRCC मुंबई व रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने आयोजित लहान मुलांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर काल दि १९ जानेवारी २०२५ रोजी यशस्वी रित्या संपन्न झाले .SRCC च्या संचालिका डॉ शिवांगी पुरंदरे यांच्या पुढाकाराने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते . प्रियदर्शनी संकूल,गावठाण लोणावळा, येथील शिवदुर्ग मित्रच्या हॉलमध्ये या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबीरात मुंबई हून आलेल्या SRCC च्या प्रत्येक गोष्टीमधील तज्ञ डॉक्टरांकडून लहान मुलांच्या बाबतीतील पुढील लक्षणांची तपासणी करून पुढील उपचार सुचवले .१ . चालण्यात असंतूलन२ . अवयवांचे विकार३ . स्नायुंचे विकार४ . हाडांना झालेली दुखापत५ . सेरेबल पाल्सी६ . पाठीच्या कण्याचे विकार७ . स्वमग्नता८ . अतिचंचलता९ . फिट / झटके येणे, शुद्ध हरपणे१० . स्नायुंचे आखडणे११ . शिक्षकण्यातील अक्षमता१२ . अनुवांशिक विकार१३ . भौतीक उपचार१४ . स्पीच थेरपी१५ . मानसशास्त्र व वर्तणूक थेरपी१६ . व्हिजन थेरपी या शिबिरासाठी शिवदुर्ग मित्र चे श्री सुनिल गायकवाड , आनंद गावडे सर उपाध्यक्ष महेश मसने , राजेंद्र कडू , अनिल सुतार तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले .रोटरी क्लबचे रो.आशिष मेहता,रो.सौ .ब्रिंदा गणात्रा व रो .जयवंत नलोदे हे उपस्थित होते . या शिबीरासाठी माजी उपनगराध्यक्ष श्री श्रीधर पुजारी तसेच श्री प्रकाश पाठारे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले .या शिबीरात ४५ मुलांची तपासणी करून पुढील उपाय सुचवण्यात आले .

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

Chat with us