पिंपरी-चिंचवड पैलवान काळुराम लांडगे यांना श्रीरामपुर येथे “वर्ल्ड पार्लमेंट क्लायमेट एमिझरी अवॉर्ड २०२५”चा पुरस्कार








मावळ मराठा न्युज -दि.३१.१२.२०२५ श्रीरामपुर येथे व्हि.आय.पी. गेस्ट हाऊस मध्ये नुकत्याच वर्ल्ड कंन्स्टीट्युएशन आणि पार्लमेंट असोसिएशन ( WCPA ) यांच्या वतीने वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२५ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रात , धार्मिक , क्रिडा , कला , शैक्षणिक , आरोग्यविषयक , पर्यावरण , साहित्यविषयक , सहकार , पत्रकारिता , राजकिय , उद्योग अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्रातून आलेल्या व उल्लेखनिय काम करणार्या २० समाजसेवकांना सन्मानित करण्यात आले.त्यामध्ये कासारवाडीतील सामाजिक सेवेतील अष्टपैलु व्यक्तीमत्व पैलवान काळुराम लांडगे यांना कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे स्वराज्य कॉन्समर जस्टिज आणि नवी दिल्ली वेलफेर कमिटीचे सदस्य मा.डॉ. दिनकर पतंगे , साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन नवी दिल्लीचे सदस्य प्रा.डॉ. शंकर अदनानी , जिजाऊ माँसाहेब व राजे लखोजीराव जाधवराव सिंदखेड राजा यांचे वंशज मा.शिवाजी दत्तात्रय राजेजाधव , संताजीराजे राजेघोरपडे यांचे वंशज मा.संजयकुमार राजेघोरपडे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह , मानपत्र , शाल देऊन सर्वोत्कृष्ट समजला जाणारा ” वर्ल्ड पार्लमेंट क्लायमेट एमिझरी अवॉर्ड २०२५ “हा पुरस्कार बहाल करण्यात आला यावेळीसोलापुर जिल्ह्याचे शिक्षक असोसिएशनचे सदस्य मा.किसन कांबळे , महाराष्ट्र इडिटरियल कौन्सिल मुंबईचे सदस्य मा.प्रकाश कुलथे , सोशल वर्कर मा.आप्पासाहेब तरटे , सोशल वर्कर मा.अमोल जाधव उपस्थित होते.कार्यक्रम संपुर्ण पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.दत्ता विघावे व त्यांच्या संपुर्ण टिमने प्रयत्न केले.कार्यक्रमास पुरस्कार्थी व त्यांच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी भरपुर गर्दी केली होती.



