वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा



मावळ मराठा न्यूज :- वडगाव,वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने ८ मार्च, २०२३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वडगाव येथील न्यायालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले व याप्रसंगी उपस्थित सर्व महिला भगिनींचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अनेक वकील बंधु-भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडगाव येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी जी देशमुख, न्यायाधीश आर एन चव्हाण,न्यायाधीश ए एस अग्रवाल,न्यायाधीश जी एस पाटील व न्यायाधीश एस आर बर्गे, ॲड सिताराम बवरे, ॲड एन एस दाभाडे, ॲड अशोक ढमाले, ॲड रंजनाताई भोसले, माजी अध्यक्ष ॲड धनंजय कोद्रे, ॲड अजित वहिले यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व महिलाशक्तीचे महत्व कवितेमधून विशद केले. यावेळी उपस्थित महिलांकडून महिला सबलीकरण या विषयावर भारूडाचे देखील सादरीकरण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड दीपकजी चौधरी, उपाध्यक्ष ॲड सोमनाथ पवळे, उपाध्यक्षा ॲड मिनाक्षीताई ढोरे, सचिव ॲड मोनालीताई कुलकर्णी- शेलार, सचिव ॲड राम शहाणे सर, खजिनदार अॅड प्रिया पंडीत, सदस्या ॲड प्रणोती पिंगळे, ॲड साक्षी मोरे, ॲड रोहिणी मुथा, ॲड प्रियांका शिंदे, ॲड मोझेस बनसोडे, ॲड प्रदिप ढोकर, ॲड अक्षय रौंधळ, ॲड प्रतिक देशमुख, ॲड अविनाश शिंदे, ॲड सागर शेटे यांसह अनेक वकील बंधु- भगिनींनी विशेष प्रयत्न केले.




