लोणावळा नगरपालिका गवळीवाडा शाळा क्रमांक ६ च्या वतीने बालदिंडी







मावळ मराठा न्युज – लोणावळा, दिनांक ३/७/२०२५ गुरुवार लोणावळा नगरपालिका गवळीवाडा शाळा क्रमांक ६ मधील बाल संतांनी दिंडीचा कार्यक्रम करण्यात आला. अतिशय सुंदर असे विठ्ठल रुक्माई ची पालखी तयार करून सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी संतांची वेशभूषा करून दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोणी संत तुकाराम झाले होते कोणी संत ज्ञानेश्वर झाले होते तर कोणी मुक्ताई झाल्या होत्या. विठ्ठल रुक्माई चा वेशभूषामध्ये विद्यार्थी आज कार्यक्रमास उपस्थित होते. गवळीवाडा शाळा क्रमांक सहा मधून दिंडी काढण्यात आली. गवळीवाडा राम मंदिरामध्ये दिंडी नेण्यात आली त्या ठिकाणी मुलांनी रिंगण केले मुली फुगडी खेळल्या त्याचबरोबर या कार्यक्रमांमध्ये पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री पवार यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमासाठी शाळेतील मुख्याध्यापिका नंदा तांदळे , तसेच श्री प्रभाकर पवार सर सौ मनीषा सरोदे मॅडम, येणारे मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते तसेच या कार्यक्रमात अंगणवाडीच्या शिक्षिका सौ संगीता गवळी, व रोहिणी नवले याही उपस्थित होत्या.




