लोणावळ्यात घुटका तंबाखूचा सुळसुळाट; सामान्य नागरिकांना दिसतं ते पोलीसांना का दिसत नाही,कुणाच्या आशीर्वादाने सर्रास घुटका विक्री?

मावळ मराठा न्युज – लोणावळा,(दिनांक-२ एप्रिल,२०२६,गुरुवार) काहीच महिन्यापूर्वी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळ्याच्या सर्व समस्या मग त्यात अवैध घुटका विक्री असेल,अवैध दारू विक्री असेल,वाहतूक कोंडी असेल सर्व समस्या सोडवण्यात येतील असे लोणावळ्यातील नागरिकांच्या समक्ष आश्वासन दिले होते. संदीप गिल यांची नवीनच निवड झाली होती त्यांना काही दिवस द्या कोणतीही समस्या शिल्लक राहणार नाही असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.परंतु अद्याप ना अवैध घुटका,अवैध दारू अवैध धंदे थांबलेत ना वाहतूक कोंडीची समस्या सुटली.लोणावळ्यात सर्रास घुटका आणि तंबाखू विक्री सुरु आहे. ती ही छत्रपती शिवाजी महाराज,भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले,संत गाडगे बाबा ज्यांनी आयुष्यभर व्यसनमुक्तीसाठी आपले आयुष्य घालवले अश्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यापासून हाकेच्या अंतरावर अश्या प्रकारे घुटका,तंबाखू विक्री होते हे सर्व सामान्य नागरिकांना दिसते,पत्रकारांना दिसते आणि पोलिसांना दिसत नाही ;की पाहून कानाडोळा करणं यामागे नक्कीच काही हप्तेगिरी सुरु असल्याचे स्पष्ट दिसत आहे. बाहेरून चारचाकीने आणि गावात स्कुटरने माल येतोय हे सामान्य नागरिक यांना दिसते तेच मात्र लोणावळा पोलिसांना दिसत नाही याच्या मागे काय गौड बंगाल आहे हे न कळण्या एवढे नागरिक दूधखुळी नक्कीच नाही.एकीकडे लोणावळ्यात अनेक वर्षे नशामुक्ती अभियान राबविले जाते. तत्कालीन डी वाय एस पी सत्यसाई कार्तिक यांनी प्रभावी नशा मुक्ती अभियान राबवले. आणि आता दुसरीकडे सर्रास घुटका,तंबाखू विक्री सुरु, हा पोलिसांचाच विरोधाभास च म्हणावा लागेल. पोलिसांनी व्यसन मुक्तीसाठी घुटका बंदी करण्या ऐवजी तरुणांना व्यसनाला प्रवृत्त करताना दिसत आहेत . तरी लोणावळा पोलिसांनी घुटखा बंदिवर कडक कारवाई करून त्वरित बंद करावेत अन्यथा आम्हा पत्रकारांकडूनच पुन्हा व्यसन मुक्ती अभियान हातात घ्यावे लागेल आणि त्याची सुरुवात लवकरच लोणावळा शहर पोलीस स्टेशन वरूनच करावी लागेल.याची त्यांनी नोंद घ्यावी.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page