जयहिंद लोक चळवळ,लोणावळा आयोजित २७ एप्रिलला”यशस्वी भवःसेमिनार”!एम पीएससी, यूपीएससी आणि स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी

मावळ मराठा न्युज – लोणावळा,”जयहिंद लोकचळवळ, लोणावळा” या संस्थेच्या मार्फत विविध शैक्षणिक,सामाजिक व अन्य विविध उपक्रम राबविले जातात.त्याचाच एक भाग म्हणून आपल्या विभागातील गरीब,हुशार, पात्र आणि होतकरू अश्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तसेच वैयक्तिक विकासात योग्य करियर मार्गदर्शनाची भूमिका जयहिंद चळवळ पार पाडणार आहे. आजच्या धावत्या,वेगाने बदलणाऱ्या आणि स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व क्षमतांनुसार योग्य करियर निवडण्यासाठी योग्य दिशादर्शन मिळणे आवश्यक आहे. अनेक वेळा योग्य माहिती अभावी विद्यार्थी गोंधळात पडतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन जयहिंद लोक चळवळ,लोणावळा यांच्या वतीने एक व्यापक आणि उपयुक्त करियर मार्गदर्शन शिबिर सोमवार, दिनांक २७/०४/२०२६ वेळ-सकाळी ११ .०० ते दुपारी ०१ .०० (प्रथम सत्र) दुपारी ०१ .०० ते ०३ .०० (स्नेह भोजन) दुपारी ०३ .०० ते सायंकाळी ०५ .०० (द्वितीय सत्र)आयोजित केलें आहे .या शिबिरामध्ये तज्ञ मार्गदर्शक, शिक्षणतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील अनुभवी व्यक्ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, क्षमता आणि कल ओळखून योग्य करियर ची दिशा निवडण्यास मदत केली जाणार आहे.विद्यार्थ्यांना विविध करियर क्षेत्रांची ओळख करून देणे, (विज्ञान, वाणिज्य, कला, तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा इ.)१० वी व १२ वी नंतरच्या शिक्षणाच्या विविध पर्यायांची माहिती देणे,
विद्यार्थ्यां मधील कौशल्ये, आवड व क्षमता ओळखण्यास मदत करणे,करियर निवड करताना येणाऱ्या शंका व गैरसमज दूर करणे,योग्य मार्गदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे हाच शिबिराचे मुख्य उद्देश असल्याचे आयोजक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती (इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट, आयटी, डिझाईन इ.),स्पर्धा परीक्षा व त्यांची तयारी (MPSC, UPSC, NDA, Banking इ.),नव्या करियर संधी (डिजिटल मार्केटिंग डेटा सायन्स, अॅनिमेशन उद्योजकता इ.),वेळ व्यवस्थापन व अभ्यास पद्धती आणि प्रश्नोत्तर सत्र (Q&A सेशन)असे अनेक विषय शिबिरामध्ये असणार आहेत.शाळेतील इयत्ता ९ वी ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यांनी या शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळून त्यांच्या भविष्यासाठी भक्कम पायाभरणी होईल,त्या साठी लोणावळ्यातील सर्वच शाळेतील विदयार्थ्यांनी या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेत जयहिंद चळवळचे निखिल कवीश्वर,शुभम जोशी,प्रसाद वाडेकर,आणि विघ्नेश सोनावणे यांनी केलें आहे.
एम् पी एस सी, यू पी एस सी आणि अश्या स्पर्धा परीक्षा यांची तयारी कशी? केव्हा? आणि का करावी याचे उत्तर मिळवण्यासाठी दिनांक २७/०४/२०२६ सोमवार रोजी लोणावळ्यातील महिला मंडळ सभागृह, हुडको कॉलनी, लोणावळा येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन जयहिंद चळवळ संस्थेकडून करण्यात आले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page