चिखली,शरद नगरमध्ये भक्तीमय वातावरणात हनुमान जयंती साजरी

मावळ मराठा न्यूज:- चिखली(प्रतिनिधी) शरद नगर येथील वीर हनुमान मंदिराच्या वतीने आयोजित केलेल्या हनुमान जयंतीनिमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी मंदिराला केलेली विद्युत रोषणाई व मूर्तीला केलेली फुलांची आरास आकर्षक दिसत होते. तसेच देवराम मेदनकर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ सुमारे १५ हजार भाविकांनी घेतला.यावेळी माजी नगरसेवक एकनाथ पवार,माजी नगरसेविका मंगलाताई कदम,माजी नगरसेविका योगिताताई नागरगोजे,माजी नगरसेवक सुनील लोखंडे, विष्णुपंत नेवाळे,सचिन सानप,निलेश नेवाळे आदी उपस्थित होते.रामनवमी ते वीर हनुमान जन्मोत्सव सालाबाद्रमाणे याही वर्षी भक्तिमय वातावरणात पार पडला. या काळात विविध महिला भजनी मंडळाचे कार्यक्रमाचे आयोजित केले होते. रामनवमीच्या दिवशी ह भ प गणेश महाराज जगताप यांनी कीर्तनसेवा केली. हनुमान जन्मोत्सवाचे ह भ प अर्जुन महाराज फलके यांचे किर्तन झाले. हनुमान जयंती या दिवसाचे औचित्य साधून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मरणार्थ राजेश दिलीप साने यांनी मंदिरासाठी वॉटर कुलरची मशीन भेट दिली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

Chat with us