लोणावळा शहरात शिवसेना सचिव पुणे व सोलापूर जिल्हा संपर्क नेते संजय मशिलकर यांची महायुती प्रचार कार्यालयास सदिच्छा भेट

मावळ मराठा न्युज :- लोणावळा शिवसेना,भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय ( A)रासप मनसे,एसआरपी घटक पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरात बुधवार दिनांक ८ मे रोजी शिवसेना सचिव पुणे व सोलापूर जिल्हा संपर्क नेते संजय मशिलकर यांनी आज महायुती लोणावळा शहर प्रचार कार्यालयास सदिच्छा भेट दिली. लोणावळा शहर शिवसेना,महिला आघाडी,युवासेना यांच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या बरोबर प्रभाग निहाय बूथ यंत्रणा, गटप्रमुख व प्रचार यंत्रणा व पक्ष संघटना बाबतीत चर्चा करण्यात आली. या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार आप्पा बारणे यांना लोणावळा शहरातून जास्तीत जास्त मतांची आघाडी देण्यासाठी जोमाने काम करा असे आदेश शिवसेना सचिव श्री संजय मशिलकर यानी दिले या प्रमुख पदाधिकारी बैठकीस शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर, महिला आघाडी शहर संघटिका मनीषा भांगरे, युवासेना शहर अधिकारी विवेक भांगरे, उपशहर प्रमुख निखिल सोमण, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, शहर सल्लागार राजूभाऊ चव्हाण, बाळासाहेब सकट, सल्लागार पराग राणे, सौ सुधाताई सोमण, शहर सोशल मीडिया समन्व्यक नंदू कडू, उत्तर भारतीय सेल अध्यक्ष दिलीप दुबे, युवासेना उपशहर अधिकारी आतिष भांगरे, विभाग प्रमुख प्रमोद लोहिरे, उपविभागप्रमुख विवेक शिलवने, युवासेना शहर संघटक सुधांशु शेलार, शाखाप्रमुख परेश वावळे, महिला आघाडी उपशहर संघटिका आयेशा शेख, दिपाली शिरंबेकर, शाखाप्रमुख प्रमोद फाटे,शाखाप्रमुख प्रसाद कन्नन, शाखाप्रमुख ललित कदम,राकेश सकट, नितीन साठे, ऋषिकेश दाहोत्रे आदी पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page