श्री एकवीरा देवीची यात्रा पालखी सोहळा निमित्त दिनांक २७ मार्च ते २९ मार्च पर्यंत परिसरात मद्य विक्रीस बंदी

मावळ मराठा न्यूज :- लोणावळा,महाराष्ट्राची कुल दैवत असलेल्या श्री एकवीरा देवीची यात्रा आणि पालखी सोहळा उत्सवाला दिनांक २७ मार्च २०२३ ते २९ मार्च २०२३ रोजी सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्र बाहेरून देखील लाखो भाविक आई एकवीराचा दर्शनाला येत असतात. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी मौजे कार्ला, वेहेरगाव,वरसोली,मळवली आणि वाकसाई ता.मावळ जिल्हा पुणे या गावातील सर्व प्रकारच्या मद्य विक्री अनुज्ञप्ती तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी नुकतेच पारित केले आहेत.या यात्रसाठी सुमारे ५ ते ६ लाख भाविक दरवर्षी येत असतात. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी दिनांक २७,२८,आणि २९ मार्च रोजी श्री एकवीरा यात्रनिमित्त महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम १९४९ मधील नियम १४२ अनव्ये प्राप्त असलेल्या अधिकार नुसार डॉ राजेश देशमुख जिल्हाधिकारी ,पुणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पारित केले आहेत.वर नमूद केलेल्या दिवशी सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवायचे आहे. त्या बाबत नुकसान भरपाई दिली जाणार नाही .कायद्याचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम १९४९ मधील नियमानुसार कारवाई केली जाईल असेही पत्रकात नमूद केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page