हमाल पंचायत मावळ तालुका यांच्यावतीने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण आणि श्रमिक यावर विचार मंथन




मावळ मराठा न्युज -लोणावळा,मावळ तालुका हमाल पंचायत यांच्या वतीने हमाल पंचायत येथे ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक नितीन अगरवाल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष राजाराम साबळे लोणावळा नगरपरिषदेचे दिलीप गायकवाड,नारायण पाळेकर,गणेश चव्हाण, जेष्ठ नागरिक संघांचे पांडुरंग तिखे,रमेश म्हाळसकर,सच्चदानंद बलराज,विलास डम,रतन सावळे,शिवाजी जाधव,महेंद्र सावळे,नवनाथ आडकर,प्रकाश कदम,आकाश कागदे वाघू दळवी,संतोष ओझरकर आणि श्रमजीवी सर्व संघटना,रिक्षा, टपरी,पथ विक्रेता संघटना कामगार संघटना चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खऱ्या अर्थाने या छोटेखानी म्हणजे आठ बाय १० च्या खोलीत झालेल्या कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कामगार कष्टकरी श्रमिक असंघटित कामगार यांनी एकत्र येण्याची आणि सरकारच्या कामगार विरोधी धोरणविरोधात रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे सर्व मान्यवरांनी यावेळी आपल्या मनोगतात व्यक्त केले.




