लोणावळ्यातील गोल्ड व्हॅली सेक्टर डी चा १०० झाडे लावण्याचा आणि जगवण्याचा संकल्प


मावळ मराठा न्यूज :- लोणावळा, लोणावळा नगरपरिषदेने देश पातळीवर स्वच्छता आणि पर्यावरणच्या बाबतीत मोठा नावलौकिक आणि पारितोषिक मिळवली आहेत. लोणावळ्यातील हाउसिंग सोसायटी आणि प्रत्येकानं आपल्या घराबाहेर एक झाड लावा आणि जगवा अशी अपेक्षा लोणावळा नगर परिषदेने व्यक्त केली आहे आणि त्याला नागरिक आणि हाउसिंग सोसायटयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरण रक्षणा साठी एक सामाजिक जबाबदारी म्हणून तुंगारली येथील गोल्ड व्हॅली भागातील गोल्ड व्हॅली सेक्टर डी मध्ये व्यवस्थापक समितीने कमिटीने १०० झाडे लावण्याचा आणि ती जगवण्याचा संकल्प केला आहे.याचा शुभारंभ म्हणून पहिल्या टप्प्यातील २५ झाडे श्री राम नवमीच्या दिवशी लावण्यात आली.१४ एप्रिल या दिवशी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी २५ झाडे लावण्यात येणार आहेत. त्यानंतर एक मे महाराष्ट्र दिन या दिवशी २५ झाडे आणि अश्या एकूण १०० झाडांचा शेवटचा टप्पा हा ६ जून रोजी पूर्ण करणार आहेत.व्यवस्थापक समितीचे मुख्य सल्लागार विनायक मेहेर व सदस्य स्वप्नील सावंत,विजय चौधरी ,वेणू यादव,राजेश केदार,लक्षमनी बेलकर,पटेल जुलेख मुबिन,पटेल मुबिन अमीन,ऋषींनाथ साळुंखे,शेख इफ्तिखार ,रोहिदास विकारी आदींनी हा १०० झाडे लावण्याचा आणि ते सर्व जगवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे, ही बाब इतर सोसायटयांसाठी आदर्श घालून देणारी आहे कारण त्या भागात पाण्याची समस्या आहे तरी देखील गोल्ड व्हॅली सेक्टर डी ने हा घेतलेला निर्णय कौतकास्पद आहे. या उपक्रमातील सर्व झाडी ही साधारणतः ५,६ फुटाची आहेत.




