धार्मिक वातावरणात निघाली २४ तीर्थंकरांची रथयात्रा



पिंपरी(प्रतिनिधी) चिंचवड(सुदर्शन नगर) येथील श्री अरिहंत दिगंबर जैन ट्रस्टच्या वतीने १००८ श्री महावीर भगवान जन्मकल्याण महोत्सव अंतर्गत आदिनाथ भगवान ते महावीर भगवान अशा २४ रथाद्वारे २४ तिर्थकरांची जल्लोषपूर्ण व धार्मिक वातावरणात प्रभावना फेरी काढण्यात आली. यावेळी श्री अरिहंत दिगंबर जैन ट्रस्टचे अध्यक्ष नेमीचंद ठोले, कार्याध्यक्ष शीतल पहाडे, सतीश दोशी, श्री शीतल शाह आदी उपस्थित होते. या प्रसंगी अरिहंत युवा मंडल व पारस भवन ट्रस्ट चे मोलाचे सहकार्य लाभलेया रथयात्रेची सुरुवात सुदर्शन नगर येथील १००८ श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरापासून झाली. फरांदे डेंटल हॉस्पिटल- प्रा मोरे नाट्यगृह- चाफेकर चौक- बस स्थानक- केशव नगर- कल्याण प्रतिष्ठान- काकडे पार्क- शिवाजी उदय मंडळ- लिंक रोड- गावडे पेट्रोल पंप- सुदर्शन नगर मार्गे मंदिरात सांगता करण्यात आली.यावेळी नववारी साड्या परिधान केलेल्या महिलांनी ढोल लेझीमच्या तलावर ठेका धरत नृत्य सादर केले.यावेळी भाविकांनी महावीरांच्या नावाच्या जयघोषात दिल्या.रथासह सहभागी जुन्या विंटेज कार व रोल्स रॉयल्स या मोटार गाड्या आकर्षण ठरल्या.या रथयात्रा फेरीत सुमारे चारशे भाविक सहभागी झाले होते.या व्यतिरिक्त मंदिरात अभिषेक, शांतीधारा,सामूहिक पूजन,भगवान महावीरांचा पाळणा, वात्सल्य भोज,रक्तदान शिबीर, संध्याकाळी महाआरती असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.




