संपर्क ग्रामीण विद्या विकास केंद्र, भांबर्डे येथे”इंडिया साऊथ आफ्रिका”चा अभिनव उपक्रम

मावळ मराठा न्युज :-मावळ, जेंडामार्क कंपनी आणि संपर्क विद्या विकास केंद्र शाळेच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला यामध्ये आठवीतील विद्यार्थ्यांना विविध दहा विषयावर दक्षिण आफ्रिकेतील संस्कृती, खेळ, प्रेक्षणीय स्थळे, चलन, खाध्यपदार्थ, नैसर्गिक खनिजे, सण, उत्सव, खादयपदार्थांची रेसिपी, येथील हवामान, पारंपरीक जाती जमाती व विविध कला नृत्य याची माहिती टॅब द्वारे गोळा करून प्रत्येक विषयानुसार गटातून मुलांनी चार्ट व देखावे, खाद्य पदार्थ्यांचे पाककृती माहिती सादर केली यासाठी जेंडामार्क कंपनीच्या वतीने मुलांना 50 टॅब देण्यात आले होते या सर्व देखाव्याचे प्रदर्शन 1 फेब्रुवारी रोजी विद्यालयात भरविण्यात आले होते.विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी व पालकानी दक्षिण आफ्रिका देशाची माहिती आठवीच्या विद्यार्थ्यांकडून घेतलीयावेळी दक्षिण आफ्रिका व भारत देशाची वरील विषयावर परस्पर तुलना विद्यार्थ्यांनी केली.संपर्क संस्थेच्या अतिशय दुर्गम भागात असलेल्या संपर्क विद्या विकास केंद्र भांबर्डे शाळेत असे अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जातात मुलांच्या सामान्यज्ञानात जास्तीत जास्त भर पडावी या उद्देशाने झेंडामार्क कंपनीच्या सहकार्याने संपर्क चे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी व मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज सिंग यांच्या प्रेरनेतून हा उपक्रम राबविला गेलाया उपक्रमामध्ये जेंडामार्क कंपनीच्या अश्विनी टोले, सिद्धी गायकवाड, व कियारा डेव्हिडसन यांनी मार्गदर्शन केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय चालक, वर्गशिक्षक संजय जगताप, संगणक शिक्षक हिरामण कोकणे, व शाळेचे इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाची मदत व मार्गदर्शन केलेया आगळ्या वेगळ्या विषयावर सादर केलेल्या प्रदर्शनाचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला व आफ्रिकेतील या नाविण्यपुर्ण संस्कृतीची विविध माहिती घेतली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page