लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छता अभियान,निलम अंतर्गत मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर – रिडयुस,रियुज रिसायकल( RRR)केंद्र सुरु

मावळ मराठा न्यूज : लोणावळा लोणावळा नगरपरिषदेने इंद्रायणी गार्डन येथे स्वच्छ भारत अभियान व नीलम अंतर्गत मेरी लाईफ मेरा स्‍वच्‍छ शहर या अभियानातंर्गत रिडयुस, रियुज आणि रिसायकल( RRR) केंद्र सुरु करणेत आलेले आहे. तरी या केंद्रात घरातील वापरण्‍या योग्‍य जुन्‍या चपला,जुनी कपडे, जुनी भांडी, जुनी पुस्‍तके, जुनी खेळणी, इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तू, (E – वेस्ट- मोबाईल, चार्जर,रेडियो, संगणक, ई.)वापरण्‍या योग्‍य जुन्‍या वस्‍तू इ. सर्वानी जमा कराव्यात. नकों असेल ते द्या व हवे असेल ते घ्या या धरतीवर हे केंद्र सुरू केले आहे यामुळे तुम्हास उपयोगी नाहीत त्या वस्तू येथे जमा कराव्यात व काही हवे असल्यास केंद्रातून घेऊन जावा. लोणावळा नगरपरिषद यांचे हरित ब्रँड असलेले सेंद्रिय खत माफक दरात उपलब्ध आहे.तसेच डे NULM मार्फत कापडी पिशव्या विकण्याचे केंद्र ही सुरु आहे. हे केंद्र दररोज सकाळी ९ वाजे पासून ते सायंकाळी ६ .३० वाजेपर्यंत दिनांक ०५ जून पर्यंत सुरु राहणार आहे.. तरी जास्तीत जास्त नागरिकानी यास भेट द्यावी असे आवाहन लोणावळा नगरपरिषदेकडून करणेत आले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page