डी वाय पाटील कॉलेज आकुर्डी येथील सहा विध्यार्थी विसापूर किल्ला वाट चुकले असता शिवदुर्ग टीमने त्यांना सुखरूप बाहेर काढले

मावळ मराठा न्युज – मळवली, दिनांक १२/०७/२०२५ दुसरा दिवस सहा जण विसापूर किल्ला वाट चुकले होते. साडेतीन तासाच्या अथक प्रयत्नाने सर्वांना सुखरुप खाली आणले आहे. वाट चुकलेले पर्यटक १) ओंकार आप्पासाहेब शिंदे वय.१९ रा.अहिल्यानगर २) पार्थ नरेश मगर वय.१९ रा. बुलढाणा ३) क्षितिजा अतुल जैन वय.२० रा. नाशिक ४) सुप्रिया विठ्ठल शिंदे वय.२० रा. जालना ५) धनश्री जगन्नाथ शिंदे वय.२१ रा.जालना ६) स्नेहा सिताराम भिंगारे वय.१९ रा. राहुरी,अहिल्यानगर सध्या सर्व रा. आकुर्डी DY पाटील कॉलेज आहेत.सर्वांना विसापुरवरुन खाली सुखरूप घेऊन आलो आहोत त्यांचा ग्रुप पाटण गावातून मळवली रेल्वे स्टेशन येथे चालत गेला आहे.शिवदुर्गची आजची टीम मध्ये अनिकेत आंबेकर,विशाल शिंदे, सागर कुंभार,यांचा समावेश होता.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page