रोटरी क्लब ऑफ लोणावळा,जय माँ जगदंबा नवरात्र उत्सव मंडळ कुसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर

मावळ मराठा न्युज:-लोणावळा,रोटरी क्लब ऑफ लोणावळा आणि जय मा जगदंबा नवरात्र उत्सव मंडळ कुसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पिंपरी सिरोंलॉजिकल इन्स्टिटयूट ब्लड सेंटर यांच्या सहकार्याने माऊली मंगल कार्यालय येथे रक्त दान शिबिराचे योजना दिनांक १६ ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत करण्यात आले.यावेळी ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले यात महिला वर्गाचा सहभाग मोठा होता.यावेळी रोटरी क्लब चे सर्व पदाधिकारी आणि जय मा जगदंबा नवरात्र मंडळ कुसगावचे सर्व सदस्य उपस्थित होते यात रोटरि क्लब ऑफ लोणावळा चे अध्यक्ष रो . नारायण शेरवळे,रो.रवींद्र कुलकर्णी, जयवंत नलोडे,रो.नितीन कल्याण, रो.पुंडलिक वानखेडे,रो. कौस्तुभ दामले तर जय मा जगदंबा नवरात्र मंडळ कुसगाव चे अध्यक्ष सिहंलालजी वर्मा, पांडुरंग मिनियार,राजू फाटक,मनोज वाणी,रामावतार वर्मा, गोपाल कुमावत, सुधीर कुलकर्णी, विजय वर्मा,हेमंत वर्मा,उपेंद्र कुमावत, भावेर्जी चौधरी, हरीश वर्मा,वीरेंद्र विश्वकर्मा,लक्ष्मणजी कुमावत,लक्ष्मण वर्मा आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page