शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निम्मित शिवसेना लोणावळा शहर परिवारातर्फे वॄक्ष रोपण

मावळ मराठा न्यूज़ : लोणावळा,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निम्मित पुणे जिल्हा माजी जिल्हाप्रमुख जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे यांच्या संकल्पनेतून शिवसेना लोणावळा शहर परिवारातर्फे सालाबाद प्रमाणे ह्या ही वर्षी वृक्ष रोपण पंधरवडयाचा शुभारंभ शिवसेना सचिव लोकसभा खासदार विनायक राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते, व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्ष रोपण करून करण्यात आला यावेळी मच्छिंद्र खराडे, केसरीनाथ पाटील पिंपरी चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख, श्री दिलीपजी दाजीराम घोडेकर माजी नगरसेवक,विरोधी पक्षनेते नवी मुंबई विधानसभा संपर्क प्रमुख चिंचवड यांच्या उपस्थितीत पार पडला.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्ष रोपण करून कर्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी मावळ तालुका विद्यार्थी सेनेचे माजी तालुका अध्यक्ष श्री महेश भाऊ खराडे, माजी विभागप्रमुख श्री ज्ञानदेव जांभूळकर, माजी उप सरपंच श्री शाम बाबू वाल्मिकी, माजी विभागप्रमुख श्री सुनिल इंगुळकर, संचालक श्री जितेंद्रजी राऊत, माजी शाखा प्रमुख श्री शंकर जाधव, माजी विभागप्रमुख श्री विशाल पाठारे, अवजड वाहतूक सेनेचे श्री दिनेश वीर,सदानंद पिल्लाने, युवा सेनेचे सतीश गोणते, विजय चौरे , यश खराडे, रोहन कालेकर,यश दाभाडे,राहुल साठे, बाळू दळवी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page