औंढोली गावातील एका घोड्याच्या फार्म हाऊस मध्ये आढळले अजगर चे पिल्लू,वन्यजीव रक्षक टीम धावली मदतीला

मावळ मराठा न्यूज़:- लोणावला (प्रतिनिधि ) आज पुन्हा मोरेश्वर मांडेकर यांना औंढोली गावातील एका घोड्याच्या फार्म हाऊस मधुन फोन आला कि घोड्यांच्या चारा असलेल्या रूम मध्ये अजगर जातीचे पिल्लु आहे , त्यांनी लगेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे व संस्थेचे अध्यक्ष अनिल आंन्दे याना याची माहीती देऊन लगेच तसेच मोरेश्वर मांडेकर व त्याचे छोटे बंधु निलेश मांडेकर यांना घेऊन गेलो तर एक साधारण ३ फुटाचे अजगर जातीचे पिलू दिसून आले तेथील फोन करणारे मंगेश तायडे यांनीच पहीले १०/१५ दिवसांपुर्वी असेच एक त्यांच्या दुसऱ्या बंगल्याच्या बाथरूम मध्ये अजगर आहे कळवले होते आज परत त्यांच्या सोबत आज हे छोट पिल्लु रेस्क्यू करून त्याला सोडून दिले .आज मोरेश्वर मांडेकर, निलेश मांडेकर, मंगेश तायडे तेथील घोडे फार्म हाऊस मधील माळी अदिनी सहकार्य केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page