लोणावळ्यात श्रीराम जन्मोत्सव मिरवणूक, ढोल लेझीम,फटाक्याच्या आतशबाजीत मोठ्या उत्साहात साजरा

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळ्यात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी श्रीराम मारुती सेवाभावी ट्रस्ट गवळी वाडा येथे श्री राम जन्मोत्सव पूजा,भजन, आरती, अभिषेक या धार्मिक कार्यक्रमानी संपन्न झाला यावेळी आमदार सुनील शेळके यांचा श्रीराम प्रतिमा शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. लोणावळा नगरीचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनावणे,उपनगराध्यक्ष देविदास कडू यांचा सन्मान श्रीराम मारुती सेवाभावी ट्रस्ट गवळी वाडा यांच्या वतीने करण्यात आला.यावेळी नगरसेवक अनिल गवळी,नगरसेविका मोगरे माजी नगरसेवक सुधीर शिर्के,राजू गवळी, माजी उपनगराध्यक्ष धीरूभाई टेलर,माजी नगरसेवक आणि सत्यनारायण ट्रस्ट चे अध्यक्ष नितीन अगरवाल यांचा विश्वस्त यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. अतुल जोशी यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा देखील आमदार सुनील शेळके यांचा हस्ते सन्मान करण्यात आला. ऍड निलेश अगरवाल यांचा देखील ट्रस्ट च्या वतीने सन्मान करण्यात आला.

भांगरवाडी येथील श्रीराम मंदिर येथे श्रीराम जन्म मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. श्रीराम लल्लाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

डेला रिसॉर्टचे सर्वेसर्वा जिमी मिस्त्री यांनी भांगरवाडी येथील श्रीरामचे दर्शन घेऊन मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी प्रभू श्री राम लक्ष्मण आणि सीतामाता यांचा जिवंत देखाव्याची फटकाच्या आतशबाजी, ढोल लेझिमच्या सह भव्य मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूक ही डेला रिसॉर्ट पर्यंत काढून रॅलीची सांगता करण्यात आली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page