तस्कर जातीचा बिनविषारी सापाने वन्यजीव रक्षक मावळ यांच्या सहकार्याने ७८ दिवसांनी ९ पिल्ल्याना दिला जन्म


मावळ मराठा न्यूज़ :- दिनांक २२ जुलै रोजी सौ विद्याताई काशीद यांनी वन्यजीव रक्षक मावळ सर्पमित्र भास्कर माळी मामा यांना फोन केला की आमच्या येथे एक साप आहे पण त्यांनी काहीतरी खाल्लेला आहे व एका जागेवर हालत नाही मी लगेच अविनाश कारले यांना त्या ठिकाणी पाठवले असता त्याने तो पाहिले तर तस्कर जातीचा बिनविषारी साप आहे हे सांगितले व ताईंना तो साप अंडी देत असताना दिसला मग त्यांना सांगितले की तसेच राहू द्या व अविनाशने पण त्याला तसेच ठेवले दुसऱ्या दिवशी सकाळी सापाने पूर्णपणे नऊ अंडी दिली होती नंतर आम्ही त्या सापास नैसर्गिक अधिवासामध्ये रिलीज केले व ती अंडी आम्ही आमच्या निगराणी मध्ये आमच्या संस्थेचे अध्यक्ष निलेश गराडे व वन विभागाच्या मार्फत एका विशिष्ट टेंपरेचर मध्ये मेंटेन केली व त्याच्यावरती रोज आम्ही देखरेख करत होतो ७८ दिवसांनी म्हणजेच आज रोजी त्या अंड्यांमधून सर्व पिल्ले बाहेर आली व त्यांना आम्ही व सौ विद्याताई काशीद तसेच सर्पमित्र अविनाश कारले, भास्कर माळी मामा, सुरज गोबी व वैभव वाघ यांनी मिळून त्यांची योग्य ती निगरानी व सर्व पिल्ले व्यवस्थित असल्याची खात्री केली होती व तसेच त्यांना आज नैसर्गिक अधिवासामध्ये मुक्त केले जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या ओवी प्रमाणे लाभले भाग्य वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षीही सुस्वरे आळविती।। धृ ।। येण सुखे रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष अंगा येत ।। 1 ।।आम्हास तसेच नागरिकांना आमच्या वन्यजीव रक्षक मावळतींचा संदेश आहे की आपल्या आजूबाजूची साप किंवा वन्य प्राणी दिसल्यास आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून त्या सापाचा जीव वाचेल




