भैरवी ठक्कर आणि फॅमिली आणि हिमगिरी ट्रस्ट यांच्या वतीने मायेची ऊब म्हणून रस्त्यावरील गोरगोरिबांना ब्लॅंकेट वाटप



मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळ्यात थंडीत कुडकूडनाऱ्या महिलाबंधू भगिनींना की जे गोरगरिब रस्त्यावर थंडी पासून अडोशा शोधत असतात अश्या सर्वाना मुंबई मधील भैरवी ठक्कर आणि फॅमिली आणि हिमगिरी ट्रस्ट यांच्या वतीने मायेची ऊब म्हणून त्यांचा थंडी पासून बचाव व्हावा यासाठी ब्लॅंकेट्सचे वाटप करण्यात आले.यावेळेस भैरवी ठक्कर ट्रस्ट तर्फे खंडेलवाल नंदकिशोर,गुलाबराव पाटील, उमेश खंडेलवाल, मनशक्तीचे डॉ.गोसावी,लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी,माजी नगराध्यक्षा सुरेखा ताई जाधव,हॉटेल उद्योजक उषा पंडित आणि लोणावळा गुरुस्थानचे सेवाधारी उपस्थित होते.




