फेसबूक इंस्टा अचानक बंद झाले ही टेस्टिंग असावी – युवराज दाखले


मावळ मराठा न्युज :-पिंपरी-प्रतिनिधी, फेसबुक इंस्टा अचानक बंद झाले,आपण मात्र सावध झालं पाहिजे, आपल्या हातातले हे लढायचे शस्त्र सहज असच अचानक एक दिवस काढून घेतले तर आपली अवस्था अपंगांसारखी झाली नाही पाहिजे असं स्पष्ट मत शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेश समन्वयक सकल मातंग समाज युवराज दाखले यांनी व्यक्त केले.दाखले म्हणाले आपण या माध्यमांशिवाय चळवळ चालवायला शिकले पाहिजे. अखेर हे एकमेव शस्त्र आहे ज्यातून आपण मजबुतीने लढतोय, म्हणूनच हे कधीही काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. म्हणून आपण पुन्हा साप्ताहिक, मासिक, पाक्षिक, प्रिंट मीडियाकडे ते वाचन करण्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया असे दाखले यांनी अहवान केले आहे.




