लोणावळ्यात रोटरी क्लबच्या वतीने आशा सेविका यांचा महिला दिनानिमित्त गौरव




मावळ मराठा न्युज :-लोणावळा, दिनांक -२०/३/२४ रोजी ऍड बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त लोणावळातील आशा सेविका यांचाभेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक दत्तात्रय येवले यांनी आशा सेविका यांचा करायचा गौरव केला.रोटरी क्लब ऑफ़ लोणावळाचे अध्यक्ष दिलीप पवार,खजिनदार -रोटरीयन विजया कल्याणरोटरीयन, नारायण,रोटरीयन नितिन ,रोटरीयन रवी कुलकर्णी,रोटरीयन धीरूभाई कल्याणजी ,रोटरीयन कौस्तुभ दामले, रोटरीयन वानखेडे,सौं .साखरेकर व राष्ट्रवादीच्या लोणावळ्याच्या महिला आघाडी अध्यक्षाच उमा मेहता,जेष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




