मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळाचे ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी

मावळ मराठा न्युज- मावळ व मुळशी तालुक्यामध्ये दिनांक २४/०७/२०२४ व २५/०६/२०२४ रोजी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे मावळ व मुळशी तालुक्यातील सर्व धरणाची पाण्याच्या पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे त्यातुन मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आलेला आहे. तसेच अतिवृष्टीमुळे मावळ व मुळशी तालुक्यातील नदया, ओढे यांच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धबधब्यातील पाणी प्रचंड वेगाने वाहत आहे. तसेच अतिवृष्टीमुळे डोंगर दऱ्याचे उंच तडे, दगड माती यांचे भूउत्खलन होत आहेत.मावळ व मुळशी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे सर्व पर्यटन स्थळे, धरणे व त्यासभोतालील परिसर, नदीपात्र धोकादायक स्थितीत आलेले आहेत. त्यामुळे जिवीत व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. मावळ व मुळशी तालुक्यातील सर्व गर्दीच्या पर्यटन ठिकाणामधील धोकादायक ठिकाणे प्रतिबंधित करणे आवश्यक आहे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सो पुणे यांनी जबाबदारी युक्त पर्यटन राबविणे आवश्यक असल्याच्या सुचना उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी, उपविभाग पुणे चे सुरेंद्र नवले यांनी दिल्या आहेत.भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी दिनांक २५/०७/२०२४ चे सकाळी ०८.०० वा. पासून ते दिनांक २९/०७/२०२४ सकाळी ८.०० वाजेपर्यंत खालील ठिकाणी जाण्यासाठी ठिकाणनिहाय पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत करीत आहे. सदर आदेशाची पोलिस विभाग, वन विभाग, ग्रामपंचायत इत्यादीनी संयुक्तरित्या अंमलबजावणी करावी. पोलीस विभागाने उपरोक्त ठिकाणी कायमस्वरुपी किंवा फिरता बंदोबस्त तैनात करावा, वन विभागाने त्यांचे अख्यारीतील सर्व पर्यटन स्थळे याठिकाणी कायमस्वरुपी गार्डचो नियुक्ती करावी.वरील प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारे व्यक्ती,पर्यटक हे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील असे उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी, उपविभाग पुणे चे सुरेंद्र नवले यांनी आपल्या आदेशात म्हटले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page