बौर,बौरवाडी येथुन प्रस्थान झालेली श्री भैरवनाथ, लक्ष्मीनारायण मढ़ी,पैठण दिंडी सेवा मंडळ यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्युज :-मावळ सालाबाद प्रमाने दि.२९ मार्च रोजी दिंडी बौर येथुन गावातील जेष्ठ व्यक्तींच्या हस्ते गाड्यांचे पुजन करून ग्रामदैवत श्री भैरवनाथच चांभल असा नारा देत पुढे रांजणगाव गणपतींचे दर्शन घेऊन श्री क्षेत्र मढी / पैठण/शनिशिंगनापुर/शिर्डी येथील साईंचे दर्शन घेऊन दिंडी दि.१ एप्रील पहाटे ३:३० ला मोठ्या आनंदात परतली .दरम्यानच्या काळात ह भ प लक्ष्मणमहाराज दाभाडे / प्रकाश महाराज दाभाडे . हभप दत्तामहाराज शिंदे हभप यांची प्रवचन व एकतारी भारूड तसेच युवा किर्तनकार हभप ज्ञानेश्वरीताई वायभट यांची किर्तन रूपी सेवा झाली तसेच या दिंडीतील भाविक भक्तांना श्री मारुती वाळुंज,गणेश वाळुंजकर,चंद्रकांत गायकवाड, आरूण वायभट ,भाऊ कंक , आनंता दाभाडे,संतोष ह दाभाडे,आदिनाथ दळवी व खिरीड परीवार यांच्या वतीने अन्नदान झाले तसेच क्षेत्र पैठण येथे नाथशष्टी निमित्त मावळ भुषन हभप मधुकरबुवा गराडे याच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता संपन्न झाली..

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page