मराठा आंदोलनावेळीच ब्राम्हणाची आर्थिक विकास महामंडळ मागणी म्हणजे नियोजित षडयंत्र-अभिजित आपटे

मावळ मराठा न्युज :- पुणे,जे लोक ब्राह्मण समाजाला आरक्षण मागणी साठी सरकार ला धमकी देत आहेत ते चार चाकी गाड्यांमध्ये फिरतात. यांचे अनेक व्हिडिओ हे लक्झरी कार मध्ये बसून केलेले आहेत.ब्राह्मण समाजात कोणी ही रेशन चे धान्य घेत नाही आणि खात नाही. ब्राह्मण समाज मग तो मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असा एक ही ब्राह्मण सापडणार नाही ज्यांची मुले सरकारी शाळेत शिकत आहेत.प्रत्येक कुटुंबात फ्रिज, वॉशिंग मशीन, दुचाकी, मोबाईल आहेत मग ब्राह्मण आर्थिक दृष्ट्या मागास कसे.ब्राह्मण समाजाचे मागासवर्गीय आयोगातर्फे सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून अभिजीत आपटे हे मागासवर्ग आयोग तसेच मुख्यमंत्र्यांकडे करत आहेत.ब्राह्मण समाजात शंतनुराव किर्लोस्कर, परांजपे बिल्डर, डी एस कुलकर्णी, बडवे, परसिस्टंटचे देशपांडे, चितळे बंधू मिठाई वाले असे हजारो उद्योगपती आहेत तसेच श्री नितीन गडकरी, सन्मानिय देवेंद्र फडणवीस, आमदार गाडगीळ, स्वर्गीय खासदार गिरीश बापट असे शेकडो दिग्गज राजकारणी आहेत. तर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, गो नी दांडेकर, स्वप्निल जोशी असे अनेक खेळाडू कलाकार आणि साहित्यीक आहेत आणि या सर्वांचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे.मग आम्ही आर्थिक दृष्ट्या मागास कसे? ब्राह्मण समाजाला आर्थिक विकास महामंडळाची गरज आहे असे जे लोक म्हणतात त्यांची सर्व प्रथम चौकशी लावा यांच्या घरात टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मोबाईल, चार चाकी,दुचाकी गाड्या सापडतील यांच्या शेत जमिनी सापडतील प्रचंड शेती आहे या लोकांकडे,किमान एक एकर जरी ज्याच्याकडे असेल तर तो श्रीमंत पृथ्वीवर एक जमिनीचा तुकडा असणं ही छोटी गोष्ट नाही.फोर व्हीलर मध्ये बसून व्हिडिओ बनवणारांकडे चार चाकी घेणे इतका पैसा आहे आणि ते आर्थिक विकास महामंडळ मागत असतील तर हे फक्त राजकीय षडयंत्र आहे केवळ आणि केवळ मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून काही ब्राह्मण संघटनांतर्फे मराठा समाजाच्या विरोधात चालवलेलं हे षडयंत्र आहे.सन्माननीय मनोज जरांगे साहेब स्वतः गरीब आहेत संपूर्ण मीडियामध्ये त्यांची घरची परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे.त्यांचं घर दाखवण्यात आलेला आहे त्यांनी स्वतःची जमीन मराठा समाजासाठी विकलेली आहे इतका प्रचंड मोठा त्याग असणारा हा माणूस उपोषणाला बसला की तिकडे ब्राह्मण समाजातल्या काही ठराविक लोकांच्या पोटात दुखायला सुरुवात होतं आणि केवळ आणि केवळ मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून आर्थिक विकास महामंडळाचे मागणी करून सरकारला धमक्या दिल्या जातात अशी जोरदार टीका अभिजीत आपटे यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page