आषाढी एकादशी निमित्त शिवसेवा प्रतिष्ठान लोणावळा संस्कार वर्गाच्या वतीने पालखी सोहळा

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,पालखी सोहळा अत्यंत धार्मिक वातावरणात संपन्न झाला.सोहळ्याची सुरुवात वर्गाच्या परिसरातून पालखीच्या सोहळ्याला सुरुवात झाली. पालखीमध्ये भाग घेणारे विद्यार्थी, पालक, आणि शिक्षक उत्साहाने सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती ज्यामुळे सोहळ्याला एक विशेष धार्मिकतेची छटा प्राप्त झाली होती.पालखी संस्कारवर्ग स्थानापासुन निघून विठ्ठल मंदिर, गावठाण, लोणावळा पर्यंत नेण्यात आली. पालखी मार्गावर लोकांनी आनंदाने स्वागत केले. भक्तिरसात न्हाललेल्या या सोहळ्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते.विठ्ठल मंदिरात विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने भीमरूपी, हनुमान चालीसा, हरिपाठ, पसायदान व आरत्या म्हटल्या. त्यांच्या भक्तिमय सादरीकरणाने सर्व उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.विद्यार्थ्यांच्या या गुणांचे आणि सादरीकरणाचे पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पालकांची उपस्थिती खूपच उत्साहवर्धक होती आणि त्यांनी आपल्या मुलांच्या कलेचे भरभरून कौतुक केले.हा पालखी सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या हिंदु संस्कारांच्या पल्लवीकरणाचे उत्कृष्ट उदाहरण होते. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे मुलांच्या मनात संस्कार रुजतात आणि त्यांनी आपल्या संस्कृतीची जपणूक केली पाहिजे असा संदेश मिळतो.या सोहळ्याने सर्वांनाच एक अभूतपूर्व अनुभूती दिली आणि धार्मिकतेच्या वाटेवर चालण्याची प्रेरणा दिली. शिवसेवा प्रतिष्ठान संस्कार वर्गाने आयोजित केलेल्या या सोहळ्याची आठवण सर्वांच्या मनात कायमस्वरूपी कोरली गेली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page