संजय उर्फ बाळा भेगडे माजी जनसेवकाचा वचपां काढणार तर बापू भेगडे दुसऱ्यांदा संधी देणार नाही,विधानसभा तिरंगी लढत निश्चित?



मावळ मराठा न्युज :- वडगांव,नुकताच वडगांव येथील भेगडे लॉन्स ला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता यांचा विजयी संकल्प मेळावा संपन्न झाला.या मेळाव्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, कोअर कमिटी अध्यक्ष निवृत्ती शेटे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय उर्फ भाऊ गुंड, तळेगाव दाभाडे शहर अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील,माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम बापू कदम, युवा मोर्चा अध्यक्ष नितीन मराठे,महिला मोर्चा अध्यक्षा सायली बोत्रे,लोणावळा शहर अध्यक्ष अरुण लाड, देहूरोड शहर अध्यक्ष रवींद्र उर्फ लहू शेलार, वडगाव शहर अध्यक्ष संभाजी म्हाळसकर, देहुगाव शहर भाजपा अध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल यांच्यासह मावळ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
यापुढे भाजप कार्यकर्ते यांचेकडून गळचेपी सहन केली जाणार नाही -रवींद्र भेगडे
भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी महायुतीतील मित्र पक्षांकडून भरपूर गळचेपी सहन केली. अगदी गावपातळीवरील विविध कार्यकारी सोसायटी सारख्या संस्थांमध्ये देखील भाजपच्या कार्यकर्त्यांची गळचेपी सुरु आहे पण यापुढे ती सहन केली जाणार नाही असा पवित्रा भेगडे यांनी घेतला. ह्यावेळी मावळ विधानसभेवर भाजपचे कमळच फुलणार आहे , आता कोणत्याही परीस्थितीत माघार घेणार नाही, असा निर्धार मावळ विधानसभा भाजप प्रमुख रवींद्र भेगडे यांनी भाजपच्या विराट विजयी संकल्प मेळाव्यात केला.भाजपला मानणारा मोठा मतदार आणि कार्यकर्त्यांची फळी मावळ विधानसभेत आहे. इथला परंपरागत मतदार यांची नाळ भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी , तळागाळातील कार्यकर्त्यांशी जोडली गेली आहे. आणि त्यामुळेच मावळ विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार पाठवायचा असा प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्त्याचा यंदा निर्धार आहे,असे मत रवींद्र भेगडे यांनी मेळाव्यात व्यक्त केले.सांगलीची पुनरावृत्ती मावळातही होइल? – बाळा भेगडे लोकसभा निवडणुकीत सांगली मतदार संघामध्ये बंडखोरी करून अपक्ष खासदार निवडून आला . त्याचा संदर्भ देत बाळा भेगडे यांनी मावळातही तशा पद्धतीची बंडखोरी होऊ शकते, असे संकेत या मेळाव्यात दिले. लोकांच्या मनातील उमेदवाराला संधी दिली गेली पाहिजे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.थोडक्यात काय तर यावेळची विधानसभा निवडणूक लक्षनीय ठरण्याची चिन्हे आहेत.संजय बाळा भेगडे यांचा गेल्या वेळी ९० हजार मतांनी पराभव झाला होता त्याचे उट्टे ते काढण्याची संधी सोडतील असे वाटत नाही तर बापू भेगडे यांना एकदोन वेळा आमदार पदाने थोडक्यासाठी हुलकावणी दिली आहे त्यांनी देखील आता तळागाळातील कार्यकर्ते,ग्रामस्थ,पदाधिकारी यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. शिवाय विद्यमान आमदार यांनी भाजपने तिकीट नाकारल्यावर ऐनवेळी बापू भेगडे यांनीच मन मोठे करून एकदा जनतेची सेवा करण्याची इच्छा असणाऱ्या सुनील शेळके यांना संधी दिली. २०१९ अगोदरचे सुनील शेळके यांची ओळख खरोखर जनसेवक अशी होती.गावोगावी जाऊन स्वखर्चाने गोरगरिबांची कामे करणारा खरा जनसेवक म्हणून नवलौकिक मिळवला होता. परंतु आता मावळ तालुक्याचे जनसेवकचे मालक झालेल्या सुनील शेळके यांना अजित पवार यांनी पुन्हा तिकीट दिल्यास बापू भेगडे शरद पवार गटात जाऊन निवडणूक लढवतील आणि मावळ विधानसभेत तिहेरी लढत झाल्यास पुन्हा २५ वर्षाचा भाजपच्या यशाची पुनरावृत्ती होऊ शकते.राष्ट्रवादीचा अंतर्गत कलहतून भाजप आता पर्यंत मावळ तालुक्यावर सलग २५ वर्षे विजय मिळवत आला आहे.माऊली दाभाड़े,बापू भेगडे,मदन बाफना या दिग्गजाना पराभवाचा सामना करावा लागला आहे.पाहू या आगामी विधानसभा निवडणुकीत काय होते ते ओत्सुकतेचे ठरणार आहे.




