बापूसाहेब भेगडे उद्या दिनांक २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

मावळ मराठा न्युज :-तळेगाव दाभाडे, दि. २७ : मावळ विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार बापूसाहेब जयवंतराव भेगडे उद्या (सोमवारी, दि. २८) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. पंचमुखी मारुती मंदिरापासून ढोल ताशांच्या गजरात भव्य पदयात्रेला सुरुवात होईल. बापूसाहेब भेगडे दुपारी १२ वाजता वडगाव मावळ तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज भरल्‍यानंतर वडगाव मावळ पंचायत समिती चौक येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेला ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करतील. मावळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसत असून, वाढता पाठिंबा लक्षात घेता मोठ्या मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे, असा दावा बापूसाहेब भेगडे यांनी केला आहे.सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.मावळ मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या ध्येयाने विकासाचे व्हिजन ठेवत त्यांनी आपल्या कामातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. जनतेचा अपार विश्वास आणि विकासाची दूरदृष्टी असलेल्या बापूसाहेब भेगडे यांच्याकडे तालुक्याचे नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. विकासाचे ध्येय आणि जनहिताची निष्ठा जोपासणाऱ्या या नेत्याच्या पाठिशी पुन्हा एकदा संपूर्ण मावळातील मतदार एकवटल्याचे चित्र आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढत होणार आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page