डॅशिंग,प्रामाणिक कर्तव्यदक्ष आयपीएस सत्य साई कार्तिक यांची अपर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती बद्दल सन्मान आणि निरोप समारंभ संपन्न



मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक आईपीएस श्री. सत्यसाई कार्तिक यांची अपर पोलीस अधीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व निरोप समारंभ मंगळवार दि.०४ मार्च २०२५ रोजी हॉटेल चंद्रलोक, येथे कभी ख़ुशी कभी गम या पद्धतीने संपन्न झाला,एक चांगला,प्रामाणिक,डॅशिंग अधिकारी ज्याने मावळ तालुक्यातील पोलीस खात्याला चांगली शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.येणारी पुढील तरुण पिढी व्यसन मुक्त व्हावी यासाठी त्याचे व्यसन मुक्ती अभियान सर्वांच्याच लक्षात राहील.तरुण तडपदार अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द नक्कीच अभिमानास्पद राहिली आहे.यावेळी सत्यसाई कार्तिक आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचा फेटा बांधून नागरिकांकडून सन्मान करण्यात आला.त्यांना उपस्थित मान्यवरांनी पुढील कारकिर्दी साठी शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर वडगांव,कामशेत, लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक उपस्थित होते.लोणावळा उपविभागातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी आपल्या साहेबांना शुभेच्छा दिल्या. लोणावळेकर नागरिकांनी त्यांचे तोंडभरून कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




