लोणावळ्यातील रेल्वे भागात श्री बापदेव मंदिरातश्रीरंग आप्पा बारणे यांच्या कार्य अहवालाचे वाटप शुभारंभ




मावळ मराठा न्युज: लोणावळा,शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस,आरपीआय ( A),रासप, मनसे, एसआरपी घटक पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ लोणावळा शहरातील प्रभाग निहाय मतदार संवाद दौरा आज शुक्रवार दिनांक २६ एप्रिल रोजी लोणावळा शहरातील रेल्वे विभागात आज संपन्न झाला आज महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या कार्य अहवालाचे वाटप शुभारंभ रेल्वे विभागातील श्री बापदेव मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला.रेल्वे विभागातील जिजामातानगर, डेनकर कॉलनी,स्वराज्यनगर,कालेकर मळा,राव कॉलनी, बारा बंगला,मरीमाता चाळ, आगवाला चाळ आदी ठिकाणी घरोघरी लोणावळा शहरातील महायुतीचे पदाधिकारी यांनी कार्यअहवाल व पत्रकाचे वाटप केले.




