कर्तव्यात कसूर करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव आणि पोलीस कर्मचारी यांचेवर त्वरित कारवाई करा- देविदास कडू

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा शहर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.सर्वधर्म समभाव हीं लोणावळ्याची ओळख.अश्या ठिकाणी ज्या पोलिसांवर लोणावळ्याचा नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे अश्या पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्यास सर्व लोणावळा एकत्रित होऊन पोलिसांना जाब विचारणार हे स्वाभाविक आहे. तेही ज्या डॉक्टरांनी लोणावळ्यातील नागरिकांना अनेक वर्षे आरोग्य सेवा पुरवली आहे अश्या प्रसिद्ध डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या प्रधान पार्क सोसायटीतील बंगल्यामध्ये एकदा नाही तर दोनदा सशस्त्र दरोडा पडतो आणि एपीआय जाधव आणि त्यांचे सोबत असलेले पोलीस कर्मचारी अगदी पाच ते दहा फुटाच्या अंतरावर दरोडेखोर असताना गाडीमध्ये बसून बघ्याच्या भूमिका घेतात अश्या सहाय्यक पोलीस निरीक्षक व इतर पोलीस कर्मचारी यांना त्वरित निलंबित करा अशी मागणी लोणावळा शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेते यात देविदास कडू,निखिल कवीश्वर संजय भोईर,नासिरभाई शेख,निखिल भोसले आदी मंडळींनी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना भेटून केली आहे.निखिल कवीश्वर यांनी अश्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचेवर कारवाई आठ दिवसात दरोडा टाकणाऱ्या ना समोर आणा आणि सतत होणाऱ्या चोऱ्या दरोडे आदी गुन्हे रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढवा अश्या मागण्या केल्या आहेत.यावेळी शिवसेना उबाठा चे बाळासाहेब फाटक,भाजपचे माजी अध्यक्ष अरुण लाड,माजी नगरसेवक देविदास कडू,शिवसेनेचे भोईर,मनसेचे निखिल भोसले,अमित भोसले,भाजप शहर अध्यक्ष अनंता गायकवाड,राष्ट्रवादीचे विलास बडेकर,शरद पवार पक्षाचे नासिरभाई शेख,विवेक भांगरे यांनी लोणावळा शहर पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत सदर कामचुकार अधिकारी आणि कर्मचारी यांचेवर तात्काळ कारवाई करा आणि गुन्हेगारांना त्वरित समोर आणा अशी मागणी लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचेकडे केली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page